Sun, Sep 23, 2018 11:55होमपेज › Satara › सातारा : कराडात मराठा भगिनींच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ(Video)

सातारा : कराडात मराठा भगिनींच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ(video)

Published On: Aug 01 2018 1:25PM | Last Updated: Aug 01 2018 1:27PMकराड : प्रतिनिधी 

राज्यभर मराठा समाज बांधवांनी आपल्या मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता या आंदोलनात मराठा भगिनींनी उडी घेलली आहे. कराडमध्ये बुधवारपासून मराठा भगिनींनी बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला आहे. 

कराड येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा भगिनींनी ठिय्या आंदोलन सुरू केले. राज्य शासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत आरक्षणासह मराठा समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.