Mon, Jul 22, 2019 13:13होमपेज › Satara › मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद  (Video)

मराठा आरक्षणासाठी वाईत कडकडीत बंद (Video)

Published On: Jul 24 2018 10:28AM | Last Updated: Jul 24 2018 10:33AMवाई : प्रतिनिधी
राज्यात मराठा आरक्षणसाठी मराठा संघटनांनी एक मराठा लाख मराठाचा पुन्हा एल्गार केला आहे. सोमवारी आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी  थेट जलसमाधी घेऊन आपले जीवन संपवले. याच घटनेचे पडसाद राज्यात उमटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात मराठा बांधव पेटून उठला आहे. मंगळवारी सातारा जिल्हा स्वयंस्फुर्तीने बंद करण्यात आला.