होमपेज › Satara › सातारा : काँग्रेस आमदार ठिय्या आंदोलनात

सातारा : काँग्रेस आमदार ठिय्या आंदोलनात

Published On: Aug 01 2018 1:52PM | Last Updated: Aug 01 2018 1:52PMकराड : प्रतिनिधी

कराड तालुका सकल मराठा समाज बांधवांनी कराडमधील दत्त चौकात बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनास पाठिंबा देत काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आनंदराव पाटील यांनीही दुपारी १ च्या सुमारास हजेरी लावली. यावेळी पाटील म्हणाले की, या आंदोलनात एक मराठा म्हणून सहभागी होत आहे. शासनाने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणीही त्यांनी केली. पाटील यांनी नवी मुंबई येथील आंदोलनावेळी हत्या करण्यात आलेल्या खोनोली (चाफळ, ता. पाटण) येथील रोहन तोडकर याच्या कुटुंबियांना २ लाखांच्या मदतीचीही घोषणा केली. 

काँग्रेस आमदार सामुहिक राजीनामा देणार का? याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. एक मराठा म्हणून आपला नेहमीच मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा राहिला आहे. त्यामुळेच यापुढेही मराठा समाजाच्या आंदोलनात आपण सहभागी होऊ, असे सांगत रोहन तोडकर याची हत्या करणाऱ्या संशयितांना आठवडाभरानंतरही अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थित केला.