Wed, Mar 27, 2019 02:27



होमपेज › Satara › सातारा : पोलिसांनी ५ टियर गॅस फोडले (व्हिडिओ)

सातारा : पोलिसांनी ५ टियर गॅस फोडले (व्हिडिओ)

Published On: Jul 25 2018 1:35PM | Last Updated: Jul 25 2018 2:06PM



खेड (जि. सातारा): वार्ताहर

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक बनले असून, त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला. परिस्थिती नियंत्रणात आणत असताना यावेळी जमावाकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी जखमी झाले असून, जमावाला पंगावण्यासाठी पोलिसांकडून ५ टियर गॅस फोडण्यात आल्‍या. 

बुधवारी सकाळी हजारो मराठा बांधवसह मोर्चा राजवाडा परिसरातून जिल्हाधिकरी कार्यालयापर्यंत गेला. मोर्चा संपल्यावर आंदोलक सातारा नजीक महामार्गावर गेले. फडणवीस सरकार विरुद्ध तीव्र घोषणाबाजी करत थेट महामार्गावर टायर पेटवून दिले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पेटनारा टायर विझवला. जमावाला पांगवल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, आंदोलक शिवराज पेट्रोलपंप, वाढे फाटा येथे गेले असून  आंदोलन आक्रमक बनले आहे.