Sun, Nov 18, 2018 11:19होमपेज › Satara › सातारा : कराडात मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

सातारा : कराडात मराठा समाजाचा मंगळवारी ठिय्या

Published On: Jul 21 2018 2:03PM | Last Updated: Jul 21 2018 2:03PMकराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) रेथे कराड तालुका सकल मराठा समाजाकडून मंगळवार, 24 जुलैला कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. कराडमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्य शासनाने त्वरित मराठा समाजाला न्याय देण्याची एकमुखी मागणीही या बैठकीद्वारे करण्यात आली आहे.

शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कराडच्या शासकीय विश्रामगृहात  झालेल्या बैठकीत राज्य शासनाच्या मराठा समाजाबद्दल असलेल्या भूमिकेचा निषेध नोंदवण्यात आला. त्याचबरोबर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा निर्णय घेत मंगळवारी ठिय्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. याबाबत कराड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्यासह नायब तहसिलदार मीनल भोसले यांनाही निवेदन देण्यात आले आहे.