Mon, Sep 24, 2018 13:20होमपेज › Satara › आनेवाडी टोल नाका पडला ओस(व्हिडिओ)

आनेवाडी टोल नाका पडला ओस(व्हिडिओ)

Published On: Jul 25 2018 1:45PM | Last Updated: Jul 25 2018 1:42PMलिंब : वार्ताहर 

नेहमीच वाहनांनी गर्दी असलेला आनेवाडी टोलनाका मराठा मोर्चासाठी पुकारलेल्या बंदमुळे पहिल्यांदाच मोकळा श्वास घेत असताना दिसला.

मराठा आरक्षण मिळण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र बंद पाळून पुन्हा सगळीकडे मोर्चे निघत आहेत, त्यातच औरंगाबाद येथे निघालेल्या मोर्चाच्यावेळी काका पाटील यांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतल्याने मराठा मोर्चाने आता रुद्ररूप धारण केले आहे. संपूर्ण महाराष्‍ट्रात मोठ्या प्रमाणात मोर्चे निघत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातही बंदची हाक दिली आहे. या बंदला  मोठा प्रतिसाद मिळत आहे.