Fri, Apr 26, 2019 15:22होमपेज › Satara › सातारा : फलटणमध्ये ठिय्या आंदोलन(व्हिडिओ)

सातारा : फलटणमध्ये ठिय्या आंदोलन(व्हिडिओ) 

Published On: Jul 26 2018 12:19PM | Last Updated: Jul 26 2018 12:19PMफलटण : प्रतिनिधी 

वर्षभराच्या कालावधीत मराठा समाजाने शांततेत मोर्चे काढले. मात्र, याची दखल सरकारने घेतली नाही. त्यानंतर औरंगाबाद येथे युवकाने जलसमाधी घेतल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे बंद नंतर आता ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्ह्यात फलटणमध्ये आंदोलन सुरु करण्यात आले असून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी शांतपणे 58 मोर्चे काढले, ते राज्याला न्हवे तर देशाला प्रेरणादायी ठरले. त्या मोर्चाची जगाने दखल घेतली. मात्र, भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली. त्यामुळे  फलटण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवार पासून तहसील कार्यालया समोर हजारो बांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्‍याची माहिती आंदोलकांनी दिली. 

आंदोलनादरम्यान बैल जोडीचे पूजन केले, यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.