Wed, Jul 24, 2019 12:05होमपेज › Satara › कराडात बंद, रस्त्यावर टायर पेटवले (Video)

कराडात बंद, रस्त्यावर टायर पेटवले (Video)

Published On: Jul 25 2018 10:51AM | Last Updated: Jul 25 2018 11:59AMकराड : प्रतिनिधी 

मराठा क्रांती मोर्चाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला कराड शहरासह तालुक्यातील विविध भागात बुधवारी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कराड आगारासह तालुक्यात खाजगी प्रवाशी वाहने सकाळपासूनच बंद आहेत. कराड शहरातील दुकानदारांनी दुकाने बंद ठेवल्याने कराड अक्षरशः ओस पडल्याचे पहावयास मिळत आहे. कराड-विटा मार्गावर टायर पेटवून ओगलेवाडीत पुलानजीक टाकून वाहतूक बंद पाडण्यात आली होती. 

मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, समन्वयक तसेच समाज बांधवांकडून मंगळवारी कराडमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी शांततेचे आवाहन करत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन मराठा समाज बांधवांनी व्यापारी, दुकानदार यांना केले होते. त्यानुसार बुधवारी बंदमध्ये सहभागी होत कराडकरांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. त्याचबरोबर खाजगी प्रवाशी वाहतुकीसह एसटी सेवाही बंद ठेवण्यात चाकरमानान्यांचे मात्र, मोठे हाल होत असल्याचेही पहावयास मिळत होते

तर, खाजगी प्रवाशी वाहतूक विशेषतः रिक्षा चालकांना मराठा तसेच मुस्लिम समाजातील काही रिक्षा चालकांकडून बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास दत्त चौकात केले जात होते. त्याचवेळी अत्यावश्यक सेवा सुरू होती. बंदमुळे कराडमधील गजबजलेल्या दत्त चौक, चावडी चौक, बसस्थानक परिसरातही शुकशुकाट पहावयास मिळत आहे. शहरातील रिक्षा बंद झाल्याने लोकांना पायी प्रवास करावा लागून जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळत होते. पुणे-बंगळूर महामार्गावरही महाराष्ट्र बंदचा परिमाण स्पष्टपणे पहावयास मिळत होता.