Tue, Apr 23, 2019 21:47होमपेज › Satara › सातारा : जावलीत मराठा समाजाचा दांडू मोर्चा

सातारा : जावलीत मराठा समाजाचा दांडू मोर्चा

Published On: Jul 26 2018 2:58PM | Last Updated: Jul 26 2018 2:58PMकुडाळ : प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबाबाबत शासनाकडून होत असलेल्‍या चालढकलीचा निषेध व्यक्त करत ऐतिहासिक जावली तालुक्यात सकल मराठा क्रांती मोर्चाने दांडू मोर्चा काढला आहे. मागण्या मान्य केल्या नाहीत तर या पेक्षाही  तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या मोर्चात  कुडाळ, करहर, हुमगाव, बामणोली सरताळे, सायगाव, आनेवाडी, भागातून शेकडो मराठा बांधव  उस्फुर्तपणे  सहभागी झाले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतली होती. या घटनेचे पडसात सर्वत्र घडताना पाहावयास मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जावलीत  मराठा बांधवानी कुडाळ येथे  बैठक घेत  जावलीत दांडू मोर्चा व बंदचे नियोजन केले होते. याबाबतचे निवेदन देखील पोलिस प्रशासन व तहसीलदारांना देण्यात आले होते. त्यानुसार जावली  तालुक्यातील नागरिकांनी या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. 

सकाळपासूनच कुडाळ, मेढा, केरघळ, सायगाव, आनेवाडी, सह ग्रामीण भागात  बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. कुडाळमध्ये स्वयंस्फूर्तीने हा बंद पाळण्यात आला. मेढा आणि मुख्य बाजारपेठेसह, काल करहर बाजार बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. जावलीतील मोठ्या गावांचा या बंदमध्ये सक्रिय सहभाग होता. तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या  मेढा येथे हुत्तमा चोक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोर्चा काढण्यात आला. मुसळधार पावसातही हा मोर्चा सुरच होता.  मोर्चामध्ये शेकडो मराठा बांधवांसह ,पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चासाठी पोलिस प्रशासनाने देखील बंदोबस्त ठेवला होता.