होमपेज › Satara › सातारकरांच्या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादात मानिनी जत्रेस प्रारंभ(व्‍हिडिओ)

सातारकरांच्या उत्‍स्‍फूर्त प्रतिसादात मानिनी जत्रेस प्रारंभ(व्‍हिडिओ)

Published On: Dec 23 2017 6:15PM | Last Updated: Dec 23 2017 6:15PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी 

बचत गट उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीमुळे महिलांना आर्थिक संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच सातारा जिल्ह्यातील महिलांनी विशेषतः ग्रामीण महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून अर्थकारणाला नवी चालना दिली आहे. अशा या बचत गटांना एका छताखाली आणून आजपासून २७ डिसेंबर या काळात मानिनी जत्रा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून भरविली आहे. 

या जत्रेला सातारकरांचा उत्‍स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध भागातून आलेल्या स्टॉलच्या माध्यमातून बचत गटांनी उत्पादित मालाचा शहरवासियांना फायदा होणार आहे.  या जत्रेत बचत गटाकडून विविध वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची विक्री तसेच खाण्याची पदार्थांची रेलचेल असल्यामुळेच सातारकरांची या जत्रेस गर्दी होत आहे.