Fri, Jul 19, 2019 07:14होमपेज › Satara › प्रेम संबंधाचा कुटुंबीयांना त्रास झाल्याने आत्महत्या 

प्रेम संबंधाचा कुटुंबीयांना त्रास झाल्याने आत्महत्या 

Published On: Jun 20 2018 1:16AM | Last Updated: Jun 19 2018 11:34PMमांढरदेव : वार्ताहर

मांढरदेव, ता. वाई येथील आकाश राजेंद्र मांढरे (वय 19, रा. मांढरदेव, ता. वाई) या युवकाने सातार्‍यातील बोरगाव परिसरातील खोडद फाटा येथे गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेम संबंधाच्या कारणातूनच आकाशने आत्महत्या केल्याचे मृतदेहाजवळ आढळून आलेल्या चिठ्ठीवरून स्पष्ट झाले आहे. माझ्या प्रेम संबंधामुळे कुटुंबीयांना त्रास झाला असून याप्रकरणी कोणालाही दोषी धरू नये, असे या चिठ्ठीत म्हटले आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, आकाश हा कण्हेरी, ता. खंडाळा येथे मामाकडे गेली अनेक वर्षे राहत होता. हे त्याचे आजोळ असल्याने याच ठिकाणी त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. तो सध्या बी. कॉमला होता. मामाच्या घराजवळच असणार्‍या एका अल्पवयीन मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबध होते. या संबधातून आकाशने दि. 14 रोजी त्या मुलीला पळवून नेले होते. मात्र, आकाशचा मोबाईल ट्रॅक करून या दोघांना स्वारगेट येथे नातेवाईकांनी ताब्यात घेतले. दि. 15 रोजी दोघांचे नातेवाई हे खंडाळ्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेत कोणतीही केस दाखल न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुलीचे नातेवाईक तिला घेऊन कण्हेरीला गेले होते. तर आकाश व त्याचे नातेवाईक खंडाळ्यातच चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी आकाशने लघुशंकेचा बहाणा करून तो तेथून निघाला. त्यानंतर बराच वेळ तो परत न आल्याने नातेवाईकांनी त्याची शोधाशोध केली. 

त्यानंतर दोन दिवस आकाशचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, मंगळवारी सकाळी 8.30 आकाशने गळफास घेऊन आत्महत्या मृतदेह बोरगाव येथील खोडद परिसरात एका बांधकाम सुरू असलेल्या गोडावूनमध्ये आढळून आला. यानंतर पोलिसांनी त्याची ओळख पटवण्यासाठी वायरलेसवरून प्रत्येक पोलिस ठाण्यात संदेश पोहचवला. त्यानंतर खंडाळा पोलिसांनी माहिती दिल्यानंतर त्याची ओळख पटली.

दरम्यान, बोरगाव पोलिसांना ज्या ठिकाणी गळफास घेतला होता त्या ठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली असून माझ त्या मुलीवर प्रेम असून आम्ही लग्न केले आहे. माझ्यामुळे घरच्यांची इज्जत गेली व त्यांना खूप त्रास झाला. यापुढे कोणालाही जबाबदार धरू नये. मी स्वत: हे कृत्य असल्याचे चिठ्ठीत म्हटले आहे.