Fri, Feb 22, 2019 17:48होमपेज › Satara › कराड : माणकेश्वरच्या "खडीकाठी"वर गुलाल खोबऱ्याची उधळण (व्‍हिडिओ)

कराड : माणकेश्वरच्या "खडीकाठी"वर गुलाल खोबऱ्याची उधळण (व्‍हिडिओ)

Published On: Feb 13 2018 3:09PM | Last Updated: Feb 13 2018 3:09PMतासवडे टोलनाका : वार्ताहर 

खोडशी (ता. कराड, जि. सातारा) येथे महाशिवरात्रीनिमित्त माणकेश्वराची खडीकाठी यात्रा मंगळवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी पेठसह परिसरातील आठ गावच्या वाडीवस्तीवरील हजारो भाविकांनी 'हर हर महादेव, माणकेश्वराच्या नावानं चांगभलं'चा जयघोष केला. 

खोडशीतील माणकेश्वर 'खडीकाठी' यात्रेला शेकडो वर्षांची ऐतिहासिक परंपरा आहे. पेठ (वाळवा, जि. सांगली) येथील भाविकांसह गोळेवाडी, माणिकवाडी, महादेववाडी, कापूरवाडी, जांभूळवाडी, वाघवाडी, नायकलवाडी, माणकेश्वरवाडीतील हजारो भाविकांसह खोडशी ग्रामस्थ यावर्षी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाण्याची धार या ठिकाणी मानकऱ्यांच्या खांद्यावरील सासनकाठी अलगदपणे पाण्याची धार पार करते, अशी अख्यायिका असून हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही उपस्थित रहात भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण केली. खोडशीतील खडीकाठी पेठ येथे गेल्यानंतर तेथे माणकेश्वर यात्रेस प्रारंभ होतो.