Wed, Mar 27, 2019 02:30होमपेज › Satara › साताऱ्यात महिला पोलिसाचाच पाठलाग करून विनयभंग

साताऱ्यात महिला पोलिसाचाच पाठलाग करून विनयभंग

Published On: Aug 29 2018 1:52PM | Last Updated: Aug 29 2018 1:52PMसातारा : प्रतिनिधी

महिला पोलिसाचा पाठलाग करून छेडछाड झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडल्याने खळबळ उडाली आहे. दिलीप माने (रा. शनी मारुती मंदिरापाठीमागे, सातारा) असे संशयिताचे नाव असून त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून २५ वर्षीय महिला पोलिसाचा पोलीस वसाहत, सातारा तालुका पोलीस ठाण्यासमोर तसेच राजवाडा परिसरात दिलीप माने हा पाठलाग करत होता. त्याचबरोबर जाणूनबुजून हात व पायाला स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन करत होता. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजया वंजारी करीत आहेत.