Wed, Feb 26, 2020 21:19होमपेज › Satara › साताऱ्याची पोटनिवडणूक लांबणीवर

साताऱ्याची पोटनिवडणूक लांबणीवर

Published On: Sep 21 2019 1:39PM | Last Updated: Sep 21 2019 1:35PM

महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाहीसातारा : पुढारी ऑनलाईन 

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आज, शनिवारी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा आणि देशातील लोकसभेच्या ६४ जागांवरील पोटनिवडणुकांच्या कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये महाराष्ट्रातील साताऱ्यातील पोटनिवडणुकीचा समावेश नाही. यामुळे सातार्‍याची पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे. 

साताऱ्यातील खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्‍ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. उदयनराजे यांनी राजीनामा दिल्यामुळे सातार्‍यात पोटनिवडणूक होणार आहे. मात्र आजच्‍या  ६४ जागेवरील पोटनिवडणुकीच्या मतदान कार्यक्रमात सातार्‍याच्‍या पोटनिवडणुकीचा समावेश नाही. 

महाराष्‍ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून निवडणुकांचा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. 

या राज्यात होणार पोटनिवडणुका 

अरुणाचल, आसाम, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, केरळ , मध्यप्रदेश, मेघालय , ओडिशा ,पॉण्डेचेरी, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तमिळनाडू, तेलंगाणा, आणि उत्तर प्रदेश या राज्‍यांमध्‍ये पोटनिवडणुका होणार आहेत.