Fri, Oct 18, 2019 14:54होमपेज › Satara › साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाने पवारांनी घातला 'कॉलर'ला हात! (video)

साताऱ्यात जोरदार शक्तीप्रदर्शनाने पवारांनी घातला 'कॉलर'ला हात! (video)

Published On: Sep 22 2019 8:03PM | Last Updated: Sep 22 2019 8:06PM

खासदार शरद पवारसातारा : प्रतिनिधी

महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असून शेतकरी संकटात आहे, पण आजचे राज्यकर्ते दुष्काळ आणि महापुराच्या संकटाकडे बघायला तयार नाहीत. दुसरीकडे ज्या किल्ल्यावर स्वाभिमानाचा इतिहास घडला तिथे हॉटेल आणि बार उभे करण्याचे नियोजन हे सरकार करत आहे, अशी टीका खासदार शरद पवार यांनी सातारा येथील सभेत केली. 

एकेकाळी पुरंदरच्या तहानंतर मिर्झाराजे जयसिंग यांनी शिवाजी महाराजांना दिल्लीचे आमंत्रण दिले होते. दरबारात सन्मान होईल असा शब्द त्यांनी दिला होता, पण महाराज दिल्लीत गेल्यावर दरबारात गेल्यावर त्यांना मागे बसवले. महाराज तेथून बाहेर पडले त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले, पण राजे त्यातूनही सुटले आणि महाराष्ट्रात परत येऊन त्यांनी इतिहास घडवला. यानंतर आणि आता? असा प्रश्न विचारताच सभेत हशा पिकला. त्यावर हे वागणं बरं न्हवं अस म्हणत ,पवार यांनी उदयनराजे यांना टोला लगावला. 

मी चुकलो जयंतरावांचं ऐकलं नाही. उदयनराजे भोसले यांचं नाव न घेता पवार यांनी जयंत पाटील यांचा सल्ला मी ऐकला नाही. अशी कबूली दिली. जयंत पाटील यांचा सल्ला न ऐकण्याचे कारण एवढचं होत की तुम्हा आम्हाला या गादीचा अभिमान आहे. महाराष्ट्र धर्म ज्यांनी शिकवला त्यांची ही गादी आहे. त्यामुळे काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, पण मी चुकलो मला आता त्यावर फारसं बोलायचं नाही. कारण वेगळा मार्ग स्वीकारायचा त्यांचा अधिकार आहे. असे शरद पवार सभेत म्हणाले.