Mon, Oct 14, 2019 21:09होमपेज › Satara › 'सातारा लोकसभेच्या रिंगणात पृथ्वीराज चव्हाण उतरणार या अफवाच' (video)

'सातारा लोकसभेच्या रिंगणात पृथ्वीराज चव्हाण उतरणार या अफवाच' (video)

Published On: Sep 25 2019 5:59PM | Last Updated: Sep 25 2019 7:54PM

पृथ्वीराज चव्हाणकराड : प्रतिनिधी 

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत कोणत्याही प्रकारची मुंबईत अथवा दिल्लीत बैठक झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एनएसयुआयचे राष्ट्रीय नेते शिवराज मोरे यांनी केले आहे. 

याबाबत सोशल मीडियावर शिवराज मोरे यांनी याबाबतचे आवाहन केले असून तसा व्हिडीओही व्हायरल केला आहे. भाजप नेते आणि माजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यात सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी संघर्ष होणार असल्याचे वृत्त काही न्यूज चॅनलवर दाखवले जात आहे. मात्र यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे शिवराज मोरे यांनी सांगितले आहे.