Sun, Oct 20, 2019 22:50होमपेज › Satara › उमेदवार विरूद्ध जनता हीच लढाई : श्रीनिवास पाटील (video)

उमेदवार विरूद्ध जनता हीच लढाई : श्रीनिवास पाटील (video)

Published On: Oct 02 2019 2:10PM | Last Updated: Oct 02 2019 3:13PM

श्रीनिवास पाटीलसातारा : प्रतिनिधी

प्रचाराची रणनिती मला आखण्याची काही गरज नाही. सातारच्या लोकांनीच माझ्या प्रचाराची रणनिती आखली आहे. या लोकसभा निवडणूकीमध्ये एका बाजूने उमेदवार आहे. मात्र, दुसर्‍या बाजूने उमेदवार नसून जनता हीच उमेदवार अशीच लढाई होणार आहे. यामुळे सातार्‍यातील चित्र हे जनता विरुध्द उमेदवार असेच चित्र आहे अशी प्रतिक्रिया सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी दिली. 

ते म्हणाले, लोकांनी ठरवले आहे की सातारसारख्या सुप्रसिध्द, ऐतिहासिक शहराला वळण लागले पाहिजे. आतापर्यंत चिकटलेले हे दुर्गण आहेत ते जावून आपल्‍या सातारचे नाव स्‍वातंत्र्यपूर्व काळात जसे संपूर्ण महाराष्ट्र व देशात जसे गाजले होते तसेच ते पुन्‍हा नव्‍याने पुढे आले पाहिजे. स्‍व.यशवंतराव चव्‍हाण यांचा वारसा चालवण्यासाठी मतदारराजा आता जागरुक झाला आहे.

मतदारराजा ती परंपरा पुढे चालवेल, अशी मला खात्री असून मतदारांच्यावतीने मी ही उमेदवारी स्‍वीकारली आहे, असे राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी पुढारी शी बोलताना सांगितले.