Wed, May 27, 2020 09:16होमपेज › Satara › महादेव जानकर आघाडीकडे ?

महादेव जानकर आघाडीकडे ?

Published On: Mar 16 2019 1:55AM | Last Updated: Mar 15 2019 11:07PM
सांगली : प्रतिनिधी

राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर हे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे झुकल्याची चर्चा आहे. त्यांना आघाडीतून माढ्याची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. शरद पवार याला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या अनेक जागांबाबात तिढा निर्माण झाला आहे. माढ्याबाबतही मोठा संभ्रम आहे. त्यामुळे आघाडीकडून नवी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादीत गटबाजी सुरू असल्याने आघाडीच्या नेत्यांनी जानकर यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू  केल्या आहेत.    

आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणूनही जानकर यांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे. किंबहुना राष्ट्रवादीकडूनही ते उमेदवार असतील, अशी चर्चा आहे.याला आघाडीचे नेते शरद पवार हे अनुकूल असल्याचे समजते. डाव्या  आघाडीला म्हणजे शेकापला एक जागा देण्याच्या हालचाली आहेत. शेकापचे नेते जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.