Thu, Jun 27, 2019 01:33होमपेज › Satara › लोणंदला दि 17 पासून शरद कृषी प्रदर्शन 

लोणंदला दि 17 पासून शरद कृषी प्रदर्शन 

Published On: Feb 10 2018 1:38AM | Last Updated: Feb 09 2018 11:01PMलोणंद : प्रतिनिधी

माजी केंद्रीय कृषीमंत्री, खा. शरदचंद्र  पवार  यांच्या संसदीय कायदेमंडळातील कारकिर्दीस पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल लोणंद येथील  सुवर्णगाथा उत्सव समिती व विविध  संस्थांच्या वतीने लोणंद बाजार समिती आवारात दि. 17 ते 21 दरम्यान राज्यस्तरीय शरद कृषी प्रदर्शनाचे आयाजित केले आहे. सर्व पदाधिकारी व विभागप्रमुख यांनी नेटके नियोजन करून प्रदर्शन यशस्वी करावे, असे आवाहन आ. मकरंद पाटील यांनी केले. दरम्यान, कराडनंतर आता लोणंदला असे दुसरे भव्य प्रदर्शन होत असून ते शेतकर्‍यासाठी पर्वणी ठरेल, असे मत जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

लोणंद बाजार समितीच्या आवारात चौदा  एकरात सुवर्णगाथा उत्सव समिती, साद सोशल ग्रुप, विकासधारा मंच, राज्य शासनाचा कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद, लोणंद, फलटण, वाई, कोरेगावच्या बाजार समित्यांच्या वतीने दि. 17 ते 21 दरम्यान प्रदर्शन भरणार आहे. त्याच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित पदाधिकारी व अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. जि. प. उपाध्यक्ष वंसतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कृषी विकास अधिकारी सी.जी. बागल, कृषी उपसंचालक जी. बी.  काळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, डीआरडीचे प्रकल्प संचालक एन एल थाडे, सुवर्ण गाथा उत्सव समितीचे निमंत्रक डॉ. नितीन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. मकरंद पाटील म्हणाले, पाच दिवसांच्या प्रदर्शनात अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन, अवजारे, पशुपक्षी प्रदर्शन, यंत्रे, वाहने, औद्योगीक आदींचे सुमारे 350 स्टॉल सहभागी होणार आहेत.  दि. 18 रोजी सकाळी 10 वाजता खा. शरद पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीतीत उदघाटन  होणार आहे. संजीवराजे म्हणाले, जिल्ह्याच्या उत्तर भागात प्रथमच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे. खा. शरद पवार यांच्या नावाने होत असलेले कृषी प्रदर्शन साजेसे झाले पाहिजे. स्टॉलसह जास्तीत जास्त शेतकरी कसे येतील याचे नियोजन करावे.

प्रदर्शनासाठी ना. रामराजे ना.निंबाळकर, आ. मकरंद पाटील, संजीवराजे यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्ण गाथा उत्सव समिती कार्यरत आहे. प्रदर्शन माहिती पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. बैठकीला जि. प. सदस्य दत्तात्रय अनपट, मंगेश धुमाळ, सा. बां. चे पाटील, तहसीलदार विवेक जाधव, उप अभियंता युवराज देसाई, शाखा अभियंता सुर्यकांत कुंभार, लोणंदचे मुख्याधिकारी अभिषेक परदेशी, ‘सुवर्ण गाथा’चे योगेश क्षीरसागर, हणमंत शेळके, रवींद्र क्षीरसागर, सागर शेळके, गजेंद्र मुसळे, संभाजी घाडगे, शशिकांत जाधव, रमेश धायगुडे, श्री इव्हेंटचे अमेय गारूळे आदी उपस्थित होते.