होमपेज › Satara › लोणंदजवळ अपघातात एक ठार

लोणंदजवळ अपघातात एक ठार

Published On: Feb 12 2018 2:07AM | Last Updated: Feb 11 2018 10:54PMलोणंद : प्रतिनिधी

लोणंद-फलटण रस्त्यावर तरडगावच्या लोणंदकडे जाणार्‍या इनोव्हा कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकजण ठार, तर एक गंभीर जखमी झाला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तरडगाव येथील सतीश पवार (रा. बोरकडवाडी, तरडगाव) व दिलीप पवार हे दुचाकीवरून (एमएच 11 एक्यू 6421) फलटणहून लोणंदकडे निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीला इनोव्हा कारने (एमएच11 एल 5500) पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघातात सतीश पवार यांना जबर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. तर दिलीप पवार गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी फलटण येथील रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर इनोव्हा कार रस्त्यामधील दुभाजकात जाऊन अडकली.   अपघाताची माहिती मिळताच स.पो.नि. सोमनाथ लांडे व हवालदार शिवाजी तोरडमल यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीस रुग्णालयात दाखल केले तर सतीश पवार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. या ठिकाणी नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. अपघाताची फिर्याद संतोष पवार यांनी दिली असून तपास उपनिरीक्षक साळुंखे करत आहेत.ल