Tue, Jun 25, 2019 13:09होमपेज › Satara › दाट धुक्यात लपेटला खंडाळा

दाट धुक्यात लपेटला खंडाळा

Published On: Dec 13 2017 1:59AM | Last Updated: Dec 12 2017 8:58PM

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी 

लोणंद परिसरात आज पहाटे पासुन लोणंद व परिसरावर दाट धुक्याची चादर पांघरली होती. त्यामुळे आज लोणंदला महाबळेश्‍वरचे रूप  झाल्याचे वातावरण प्राप्त झाले होते. धुके  सकाळी दहापर्यंत टिकून होते. त्यामुळे वाहन चालकांना मात्र, जरा दमानेच घ्यावे लागले. सध्या थंडीत पुन्हा वाढ झाली आहे. मंगळवारी खंडाळा तालुक्यात पहाटेपासूनच दाट धुके पडू लागल्याने संपूर्ण परिसराने शुभ्र धुक्याची दुलई पांघरली. यामुळे दहा फुटापर्यंतही दिसत नव्हते. त्यामुळे वाहन चालक हळुवार वाहने चालवत होती. या धुक्याचा आस्वाद सकाळी फिरायला जाणार्‍या नागरीकांना घेतला. या धुक्याने संपूर्ण परिसर लपेटुन गेला होता. बर्‍याच वर्षानी येवढ्या मोठ्या प्रमाणावर धुके पहावयास मिळाले असल्याने खंडाळा तालुक्यातील नागरिकांनी महाबळेश्‍वरचा अनुभव गावातच घेतला. या धुक्याने झाडे पाने फुलांवर दवबिंदु निर्माण झाले होते. श्री भैरवनाथ डोंगरावर फिरायला जाणार्‍या नागरिकांनीही या धुक्याचा आनंद घेतला. तथापि, वाहन चालकांना मात्र शिस्तीत वाहने चालवावी लागली.