Mon, Nov 19, 2018 11:31होमपेज › Satara › निसरे फाटा येथे चोरटी दारू विक्री

निसरे फाटा येथे चोरटी दारू विक्री

Published On: Jan 23 2018 10:52PM | Last Updated: Jan 23 2018 8:55PMमारूल हवेली : वार्ताहर

निसरे फाटा (ता. पाटण) येथे राज्यमार्गावरील एका हॉटेलमध्ये चोरटी दारू विक्री सुरू असून याकडे मल्हारपेठ पोलीसांचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
  राज्यातील महामार्ग व राज्यमार्गावर 500 मीटरच्या आत देशी व विदेशी दारू विकण्यास न्यायालयाने बंदी केलेली असताना कराड - पाटण राज्यमार्गावरील निसरे विहीर येथिल एका हॉटेल मधून बेकायदेशीररित्या बाटली बंद दारू विक्री सुरू आहे. काही परवानाधारक बिअरबार बंद झाले मात्र या हॉटेल मधून चोरट्या पध्दतीने सुरू असलेली दारू विक्री हा चर्चेचा विषय बनला आहे. अनेक दिवसापासून सुरू असलेल्या अवैध दारू विक्री बाबत मल्हारपेठ पोलीसांना काहीही माहिती नसल्याबाबत नागरिकांमधून आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या हॉटेलमधून ठराविक गि-हाईक पाहून चढ्या भावाने दारू विकली जात आहे. येथे दारू मिळत असल्याने मल्हारपेठ, विहे, मारूल हवेली विभागातील तळीरांमाचा लोंढा या  हॉटेलकडे लागला आहे. मात्र अशा अवैध दारू विक्रीविषयी मल्हारपेठ पोलीसांना मागमूस नाही याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यापूर्वीही निसरे फाटा येथील एका  बारवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आता निसरे विहीर येथील हॉटेलवर कारवाई होणार का ? पोलिसांनी धडक कारवाई करण्याची गरज असल्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.