Sat, Feb 23, 2019 10:44होमपेज › Satara › वाढे फाट्यावरील अपघातात युवक ठार

वाढे फाट्यावरील अपघातात युवक ठार

Published On: Feb 11 2018 12:57AM | Last Updated: Feb 10 2018 10:57PMलिंब : वार्ताहर

पुणे-बंगळूर महामार्गावर सातार्‍यातील वाढे फाटा परिसरात झाडांना पाणी देत असलेल्या ट्रकला भरधाव वेगातील ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात माल वाहतूक करणार्‍या ट्रकमधील खटावचा एकजण ठार झाला तर एक गंभीर  जखमी झाला. काशिम अब्दुल मुजावर (वय 25, रा. वर्धनगड ता. खटाव) हा ठार झाला. तर दुसर्‍या ट्रकमधील चालक केतन काशीनाथ पोळ (रा. कवठे ता. वाई) हा जखमी  झाला आहे. केवळ दैव बलवत्‍तर म्हणून डिव्हायडर मधील झाडांना पाणी देणारे कर्मचारी बचावले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  वाढे फाटा परिसरातील हॉटेल पलाश समोर पुण्याकडून सातारकडे माल वाहतूक करणारा ट्रक (क्र. एमएच 11 ए.सी 2041) निघाला होता. यावेळी महामार्गावरील दुभाजकात असलेल्या झाडांना पाणी देत  असलेल्या ट्रकला (क्र. एमएच 11 ए.सी 5065) पाठीमागून  जोरदार धडक  दिली. या अपघातात पाठीमागून धडक दिलेल्या ट्रकमधील दोघेजण गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पो. ना. पाटील करीत आहेत.