Tue, Apr 23, 2019 19:35होमपेज › Satara › अजिंक्यताऱ्यावर बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

अजिंक्यताऱ्यावर बिबट्याचा वावर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 

Published On: Mar 22 2018 7:41PM | Last Updated: Mar 22 2018 7:35PMसातारा : प्रतिनिधी

शहरालगत असणाऱ्या अजिंक्यतारा किल्ल्यावर गुरुवारी दुपारी बिबट्याचे दर्शन झाले. किल्ल्यावर फिरायला गेलेल्या नागरिकांना झाडीत बसलेला हा बिबट्या आढळला. यापूर्वी ही किल्ल्यावर अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे मॉर्निंग वॉक जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.