Sun, Jul 21, 2019 15:02
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › रानमांजराच्या पिलाला युवकाकडून जीवदान

रानमांजराच्या पिलाला युवकाकडून जीवदान

Published On: Dec 07 2017 1:31AM | Last Updated: Dec 06 2017 8:47PM

बुकमार्क करा

महाबेळश्‍वर : वार्ताहर  

युवकाने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे वाघाटी म्हणून प्रचलित असलेल्या दुर्मिळ जातीच्या रान मांजराच्या पिल्लास जीवदान मिळाले. बिबट्यासारखे दिसणारे हे मांजराचे पिल्लू दोन ते तीन महिने वयाचे आहे. हे रन मांजर इंग्रजीत लेपर्डकॅट म्हणून ओळखले जाते महाबळेश्‍वरच्या जंगलामध्ये बिबटयासारखे दिसणारे हे रानमांजर या भागात मुबलक प्रमाणात आढळतात.

मंगळवारी सकाळी महाबळेश्‍वर -तापोळा रस्त्यावर मांघर गावाच्या हद्दीत सिनसिनघळ भागात रानमांजराचे हे पिल्लू रस्ता ओलांडून पलीकडील जंगलात जात होते. हे पिल्लू बिबट्यासारखे दिसत असल्याने  त्याला वाहन चालक घाबरून पळत होते. याचवेळी त्याच्या शेजारून दुचाकी गेल्याने ते घाबरून रस्त्यातच बसले. थंडीमुळे त्याची हालचाल मंदावली होती. त्याचवेळी अमोल गाढवे हे महाबळेश्‍वरकडे येत असताना त्यांना हे पिल्लू दिसले.

त्यांनी थोडा वेळ थांबून त्याच्या आईची वाट पाहिली. मात्र, त्या पिलाची आई न आल्याने गाढवे यांनी हे पिल्लू वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड यांच्याकडे दिले.या पिलाची वैद्यकीय तपासणी केली असता ते जखमी नव्हते. परंतु, यानंतर त्याला थोडी उब देऊन दूध देण्यात आले. त्यानंतर त्याची हालचाल सुरू झाली. 

सायंकाळच्या सुमारास त्या पिलाला जेथे ते सापडले होते त्या जंगल परिसरात सोडण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. यावेळी वनरक्षक लहू राऊत,रोहित लोहार,सह्याद्री प्रोटेक्टर्सचे संदेश भिसे उपस्थित होते