Thu, Apr 25, 2019 16:17होमपेज › Satara › सातारा : बिबट्याने तीन शेळ्या केल्या फस्त 

सातारा : बिबट्याने तीन शेळ्या केल्या फस्त 

Published On: May 17 2018 2:48PM | Last Updated: May 17 2018 2:47PMसातारा : प्रतिनिधी

वाई मांढरदेव पठारावरील वेरुळी येथील शेतकऱ्याच्या बंदिस्त शेडमधील तीन शेळ्यांचा बिबट्याने बुधवारी रात्री फडशा पाडल्याने वेरुळी परिसरातील शेतकऱ्यामध्ये घबराट पसरली आहे.

वेरुळी सोमेश्वरवाडी येथील शेतकरी प्रमोद विठ्ठल जाधव यांचे राहत्या घरा शेजारीच शेळ्यांचे बंदिस्त शेड आहे. बुधवारी रात्री बिबट्याने बंद शेडच्या भिंतीवर चढून छोटयाशा मोकळ्या जागेतून शेडमधील तीन शेळ्यांचा खात्मा केला. 

घटनेची माहिती परिसरात बिबट्याची दहशती पसरली आहे . दरम्यान वनक्षेत्रपाल महेश झाजुणें वनपाल सदानंद राजापुरे, वनरक्षक वैभव शिंदे,वसंत गवारी यांनी घटनास्थळाला भेट दिली.