Mon, May 27, 2019 07:03होमपेज › Satara › सज्जनगड पायरी मार्गावर दरड कोसळली; पर्यायी वाहतूक सुरू 

सज्जनगड पायरी मार्गावर दरड कोसळली; पर्यायी वाहतूक सुरू 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:22PMपरळी : वार्ताहर 

रविवारी सकाळी सज्जनगडावर पायरी मार्गावर महाद्वाराच्या बुरुजा पाठीमागील दरड कोसळल्याने मुख्य पायरी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात  आली असून पर्यायी दुसरा रस्ता सज्जनगडावर भाविकांना तसेच वाहनांना येण्या-जाण्यासाठी सुरू करण्यात आला आहे.  

परळी-ठोसेघर परिसरात पावसाचा धडाका सुरू असून रस्ता खचणे, दरड  पडणे, घरांची पडझड  होणे असे प्रकार सुरू आहेत. सज्जनगडावर रविवारी सकाळी महाद्वार बुरुजा पाठीमागील दरड कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीत हानी झाली नाही. रामदास स्वामी संस्थानने तत्काळ या मार्गावर दोर्‍या बांधून पायी  जाणार्‍या समर्थ भक्तांची वाहतूक वळवली आहे. दुपारपर्यंत थोडा - थोडा मातीचा भराव दगड घसरून खाली येत असल्याने ही दरड हटवणे धोकादायक बनले आहे. रविवार सुट्टीचा वार असल्याने समर्थ भक्तांची संख्या मोठया प्रमाणात आहे. गेल्या काही दिवसापूर्वीही पायरी मार्गावर दरड कोसळी होती. सज्जनगड रस्त्यावर झाडे उन्मळून पडली आहेत. गडाच्या सभोवताली असलेले मोठ मोठे दगड मातीचा भराव काही ठिकाणी धोकादायक बनला आहे. अशा धोकादायक स्थितीतच वाहतूक सुरु आहे. या परिसरात अजूनही पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी दुर्घटना होवू नये म्हणून उपाययोजना करण्याची मागणी समर्थ भक्तांकडून होत आहे.