होमपेज › Satara › पळसावडेनजीक जमीन भेगाळल्याने वाहतूक ठप्प

पळसावडेनजीक जमीन भेगाळल्याने वाहतूक ठप्प

Published On: Jul 20 2018 1:13AM | Last Updated: Jul 19 2018 11:34PMपरळी : वार्ताहर

पांगारे, पळसावडे-सांडवली रस्ता  पळसावडे धरणावर सुमारे 3 फूट खचला असून सांडवलीकडे जाणारी वहातूक गेल्या 4 दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. परळी खोर्‍यात पावसाची संततधार कायम असून पडझडीच्या घटना घडत आहेत. सांडवली, वारसवाडी, गणेशवाडी, पळसावडे, बोंडारवाडी, मोरबाग, कारगाव, दावण व दत्तवाडी येथील गावकर्‍यांचा दळण-वळणाचा मार्ग बंद झाला आहे.   पांगारे,पळसावडे  लघूपाटबंधारे तलाव ओव्हरफ्लो झाले असून  सांडव्यावरून पाणी वाहत आहे . 

पाण्याच्या  प्रवाहाने  तसेच अतिवृष्टीमुळे  पांगारे  पळसावडे  रस्ता  अनेक ठिकाणी  भेगाळला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. अजूनही या परिसरात अतिवृष्टी सुरू आहे.