Wed, Apr 24, 2019 21:33होमपेज › Satara › दुचाकीच्या धडकेत मजूर महिला ठार

दुचाकीच्या धडकेत मजूर महिला ठार

Published On: Jun 21 2018 1:20AM | Last Updated: Jun 20 2018 11:59PMओझर्डे : वार्ताहर 

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील उडतारे, ता. वाई गावच्या हद्दीत सर्व्हिस रस्त्यावर पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. द्रौपदा बबन पोळ (रा. उडतारे) असे त्या महिलेचे नाव आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, उडतारे गावच्या हद्दीत असणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील सर्व्हिस रस्त्याने द्रौपदा पोळ या शेताकडे पायी निघाल्या होत्या. यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातामध्ये पोळ यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.     

मात्र उपचारादम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दुचाकी चालक प्रकाश पांडूरंग साळूंखे (रा. वनगळ, ता. सातारा सध्या रा. मंगळवार पेठ, सातारा) याच्यावर भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.