Thu, Apr 25, 2019 11:48होमपेज › Satara › शिवप्रतापदिन जावलीसाठी तेजोमय दिवस : मोहन शेटे

शिवप्रतापदिन जावलीसाठी तेजोमय दिवस : मोहन शेटे

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. शिवप्रतापदिन जावलीसाठी तेजोमय दिवस असून येणार्‍या प्रत्येक पिढीला हा दिवस प्रेरणा देणारा ठरो, असे मत शिवचरित्र व्याख्याते मोहन शेटे यांनी व्यक्त केले. 

कुडाळ येथे शिवप्रतिष्ठान व हिंदुस्थान जावली संघटनेने आयोजित केलेल्या शिवप्रतापदिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील धारकरी उपस्थित होते. शिवप्रतापदिनानिमत्त तालुक्यात करहर ते कुडाळ अशी भव्य रॅली काढण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी, जय श्रीराम, हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. 

जावलीची भूमि पवित्र असून या ठिकाणीच छ. शिवरायांनी अभूतपूर्व पराक्रम केला आहे. दहशतवाद कसा संपवावा याचा उत्तम धडा त्यांनी घालून दिला आहे. स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाला मारून छ. शिवरायांनी धर्म आणि राष्ट्रावर आलेले संकट कसे नष्ट करायचे ते दाखवून दिले. शिवचरित्र व शंभू चरित्र हृदयात धगधगत रहावे म्हणून धारकर्‍यांनी गडकोट मोहीम प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन  शेटे यांनी केले.प्रारंभी मोहन शेटे, सरपंच वीरेंद्र शिंदे, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत तरडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.