Thu, Jun 27, 2019 16:08होमपेज › Satara › जावळी : पोक्सो प्रकरणी तिघांवर गुन्हा

जावळी : पोक्सो प्रकरणी तिघांवर गुन्हा

Published On: May 25 2018 4:06PM | Last Updated: May 25 2018 4:06PMकुडाळ : प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी तीघांवर पोक्‍सोप्ररणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सूरज गणेश सुतार (रा. निपाणी, ता. जावली ),अक्षय बबन सुतार आणि अन्य एक अल्पवयीन आशा तिघांचा समावेश आहे.

याबाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फेब्रुवारी महिन्यात पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या चुलतीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपी सूरज सुतार,अक्षय सुतार, व तिसरा अल्पवयीन आरोपी या तिघांनी मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

या प्रकरणी पीडित मुलीने पोलिसांकडे या बाबतीत माहिती दिल्यानंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पीडित मुलगी ही गरोदर असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.