Fri, Mar 22, 2019 07:42होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

Published On: May 25 2018 11:36PM | Last Updated: May 25 2018 11:04PMकुडाळ : प्रतिनिधी

जावली तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांवर ‘पोक्सो’अंतर्गत मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना समोर आली असून तिघांनी अत्याचार केल्याने परिसरात व तालुक्यात खळबळ उडाली आहे.दरम्यान, संशयितांपैकी दोघे जण सज्ञान     
असल्याने त्यांना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

सूरज रमेेश सुतार (वय 20, रा. निपाणी, ता. जावली) व अक्षय बबन सुतार (वय 20, रा. गोगवे, ता. महाबळेश्‍वर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत मेढा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी  2018 मध्ये  पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या चुलतीच्या घरी गेली होती. त्यावेळी संशयित सूरज सुतार, अक्षय सुतार व अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केले. याची कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी तिला या तिघांनी दिली होती. या सर्व घटनेमुळे पीडिता घाबरल्याने तिने कोणालाही सांगितले नाही.

पीडितेला आई नसून वडील व्यसनी आहेत. त्यामुळे त्या मुलीने या घटनेची कोणालाही माहिती दिली नाही. त्यानंतर ती काही दिवसांनी ती मुलगी आजारी पडल्याने तिच्या नातेवाईकांनी तिला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी तपासणीमध्ये ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यानंतर डॉक्टरांनी ही माहिती मेढा पोलिसांना सांगितली. मेढा पोलिसांनी तिला विश्‍वासात घेतल्यानंतर पीडितेने  घडलेल्या घटनेबाबत सर्व माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयित तिघांविरूद्ध तक्रार घेतली.

पीडित मुलीने जबाब दिल्यानंतर मेढा  पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या 1 तासाच्या कालावधीतच तिन्ही संशयितांना अटक केली.  त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दि. 30 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.