Sun, May 19, 2019 14:05
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातारा : मळी सोडल्याने लिंब परिसरात हजारो माशांचा मृत्यू (video)

सातारा : मळी सोडल्याने लिंब परिसरात हजारो माशांचा मृत्यू (video)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंब : वार्ताहर

कृष्णा नदीला मळी सदृश्य रसायन सोडल्याने लिंब-गोवे परिसरातील कृष्णा नदीकाठी मासे मोठ्या प्रमाणात मारून पडले आहेत. यामुळे नदीतील पाण्याला मोठी दुर्गंधीही सुटली होती. कृष्णा नदीच्या पात्रात वेळोवेळी मोठ्या प्रमाणात मळी सदृश्य रसायन सोडायचे प्रकार वारंवार होत असतात. या गोष्टीकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसत आहे.

कृष्णा नदीच्या पात्रात आजअखेर अनेक वेळा मळी सदृश्य रसायन सोडण्याचे प्रकार घडलेले आहेत. यामुळे नदीतील मासे, खेकडे, वाम्ब, झिंगा आदी जलचर मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले होते.
गुरुवारी सकाळी लिंब-गोवे परिसरात नदीतील जलचर मोठ्या प्रमाणात मेल्याने नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्याच प्रमाणे नदीतील पाणीही मोठ्या प्रमाणात काळसर झाले होते. कृष्णा नदी पात्रात मळी सदृश्य रसायन सोडणाऱ्या कारखान्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

 


  •