Sun, Mar 24, 2019 16:11होमपेज › Satara › प्रकल्पग्रस्तांची कोयनामाई समोरच शपथ

प्रकल्पग्रस्तांची कोयनामाई समोरच शपथ

Published On: Mar 01 2018 1:49AM | Last Updated: Feb 28 2018 8:46PMपाटण : प्रतिनिधी

श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने कोयनानगर येथे सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अंदोलनात संबंधित अंदोलनकर्त्यांनी कोयना नदीचे जलपूजन करून जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याची सामूहिक शपथ घेतली. 

श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोयनानगर येथे सोमवारपासून कोयना प्रकल्पग्रस्तांच्या अंदोलनाला सुरूवात झाली आहे. आंदोलनाच्या दुसर्‍या  दिवशी यात सहभागी प्रकल्पग्रस्तांनी जवळच्या कोयना नदीपात्रात जाऊन जलपूजन केले व त्यानंतर आपण ज्या मागण्यांसाठी हे अंदोलन केले आहे त्या सर्वच्या सर्व मागण्या जोपर्यंत हे शासन मान्य करत नाही व आपल्याला न्याय देत नाही तोपर्यंत हे आमरण अंदोलन चालूच ठेवण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. 

कोयना प्रकल्पासाठी याच प्रकल्पग्रस्तांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला, मात्र याला आता साठ वर्षे उलटून गेली तरीही यांच्या मागण्यांना न्याय मिळाला नाही. पुनर्वसन,  नागरी सुविधा, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना शासकीय नोकर्या, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू आहे.  यावेळी डॉ. भारत पाटणकर यांचेसह पदाधिकारी व प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.