Fri, Apr 26, 2019 09:39होमपेज › Satara › कोयनेची वाटचाल शंभर टीएमसीकडे

कोयनेची वाटचाल शंभर टीएमसीकडे

Published On: Aug 12 2018 7:08PM | Last Updated: Aug 12 2018 7:08PMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पुन्हा पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने धरणात येणारी पाणी आवक वाढली आहे. सध्या येथे प्रतिसेकंद सरासरी १५०९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. १०५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणार्‍या या धरणात आता ९७.५० टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे केवळ ७.५० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. धरणाची शंभर टीएमसीकडे वाटचाल झपाट्याने सुरू आहे. 

कोयना धरणातील कोयना, नवजा, महाबळेश्वर या सर्वच ठिकाणी सध्या पुन्हा पावसाचा  जोर काही प्रमाणात वाढला आहे. सध्या धरणात एकूण पाणीसाठा ९७.५० टीएमसी, त्यापैकी उपयुक्त साठा ९२.५० टीएमसी, पाणीउंची २१५७.६ फूट, जलपातळी ६५७.६०६ मीटर इतकी झाली आहे. एक जूनपासून आत्तापर्यंत कोयना येथे एकूण ४०२६ मि. मी. , नवजा ४११२ मि. मी. तर महाबळेश्वर येथे ३५७३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. चालूवर्षी झालेल्या एकूण पावसात धरणात ९२.१६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.