Wed, Nov 21, 2018 21:25होमपेज › Satara ›  कोयना धरणातून आज दुपारी विनावापर पुन्हा पाणी सोडणार

 कोयना धरणातून आज दुपारी विनावापर पुन्हा पाणी सोडणार

Published On: Aug 13 2018 10:11AM | Last Updated: Aug 13 2018 10:11AMपाटण : प्रतिनिधी

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचवेळी धरणात आता एकूण पाणीसाठा हा 98.78 टीएमसी झाल्याने आज सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धरणाचे सहा वक्री दरवाजे वर उचलून त्यातून सुमारे बारा हजार क्युसेक्स पाणी प्रतिसेकंद पूर्वेकडे कोयना नदीच्या पात्रात सोडण्यात येणार आहे. 

धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2100 क्युसेक्स पाणी अगोदरच सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे.  त्यामुळे  नदीकाठची गावे, लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली. दरम्यान धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी 21524 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. 105 टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणार्‍या या धरणाला आता पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 6.22 टीएमसी पाण्याची गरज आहे.