Tue, Jun 02, 2020 20:20होमपेज › Satara › सातारा :  कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटावर (video)

सातारा :  कोयना धरणाचे दरवाजे साडेपाच फुटावर (video)

Published On: Aug 27 2018 5:24PM | Last Updated: Aug 27 2018 5:24PMकराड : प्रतिनिधी

कोयनानगर (ता. पाटण) येथील कोयना धरणातून रविवारपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. धरण भरण्यासाठी केवळ नऊ इंच पाण्याची आवश्यकता आहे. १७ ऑगस्टपासून सोमवारी सकाळपर्यंत धरणातून कोयना नदीत तब्बल ५२ टीएमसीहून अधिक पाणी सोडण्यात आले आहे. तर सोमवारी दुपारी धरणाचे दरवाजे साडेपाच फुटाने उचलून प्रतिसेकंद १३ लाख ७५ हजार लिटर पाणी नदीपात्रात सोडले जात होते.

कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५ टीएमसी इतकी असल्याने आणि पावसाळा संपण्यास अजूनही जवळपास दीड महिन्याचा अवधी शिल्लक आहे. या परिस्थितीत आता कोयना धरणात महाबळेश्वर, नवजा, कोयना तसेच पाणलोट क्षेत्रातून येणारे सर्व पाणी कोयना नदीत सोडण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. धरणात १०४.१६ टीएमसी पाणी असून धरणात प्रतिसेकंद ३१ हजार ६७ क्युसेस पाण्याची आवक होत आहे.