Sat, Apr 20, 2019 07:53होमपेज › Satara › एटीएम फोडणार्‍या तिघा जणांना अटक

एटीएम फोडणार्‍या तिघा जणांना अटक

Published On: Jun 23 2018 10:44PM | Last Updated: Jun 23 2018 10:32PMकोरेगाव : प्रतिनिधी

चिमणगाव येथील एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन युवकांना कोरेगाव पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिमणगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एकमेव एटीएम सेंटर आहे. शुक्रवारी रात्री हे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न झाला. कुर्‍हाडीच्या सहाय्याने मशीनवर हल्ला केला. मात्र, चोरट्यांच्या हाती काही लागले नसल्याने त्यांनी सेंटर समोर असलेल्या साई मेडिकल्स या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून तेथून 11 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी तत्काळ  सुत्रे हलवली. उपनिरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार वसंत साबळे, हवालदार सतीश साबळे, धनंजय बनछडे, गणेश कापरे, किशोर भोसले, अजित पिंगळे, विक्रम कुंभार, तुषार बाबर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रल्हाद पाटोळे, उदय जाधव, सागर गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी करुन सराईत गुन्हेगारांचा शोध सुरु केला. दरम्यान, श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्‍वान गावाच्या हद्दीपर्यंत जावून घुटमळले. 

पोलिसांनी संशयावरुन प्रशांत दत्तात्रय जाधव (वय 26) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच, त्याने घडल्या प्रकाराची कबुली देत अन्य दोन मित्रांची नावे सांगितली. रोहन उर्फ सोन्या विजय माने (वय 21) व चैतन्य उर्फ भैय्या मारुती नलवडे यांना  अटक केली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास हवालदार सतीश साबळे करत आहेत.