Tue, Sep 25, 2018 10:48होमपेज › Satara › उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून आली पाहिजेत

उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून आली पाहिजेत

Published On: Feb 04 2018 11:22PM | Last Updated: Feb 04 2018 11:08PMकोपरगाव : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव प्रकरणात दोषी असलेल्यांना जर जामीन मिळत असेल तर भाजपचा काँग्रेस व्हायला वेळ लागणार नाही. तसेच आगामी काळात भारताचा पाकिस्तान करावयाचा असेल तर उदयनराजे भोसले यांच्यासारखी माणसे निवडून आली पाहिजेत, असा उपहासात्मक टोला भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत लगावला.

मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची शुद्ध फेकाफेकी आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्य वर्ग या सरकारवर पूर्णता नाराज झाला असून आगामी होणार्‍या 2019 च्या निवडणुकीत भाजपाची अवस्था काँग्रेस सारखी होईल, असे भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

आंबेडकर म्हणाले, बजेटमध्ये फक्त लोकांना कागदोपत्री खुश ठेवण्यात आले आहे. गॅस सबसिडीवर जेमतेम अर्थव्यवस्था चालली गेली. त्यामुळे सध्या मंदीची लाट सर्वत्र दिसत आहे. देशभरात 8 लाख कोटी रुपयांची मदत शासन बँकांना करीत आहे तर दुसरीकडे याच शासनाने मोठ्या उद्योजकांचे कर्ज माफ केले आहे. अर्थसंकल्पात कधीही भाववाढ नसते. शेतकर्‍यांना दीडपट भाव वाढून दिला मात्र शेतीमूल्याच्या रकमेत ती प्रवर्धित झालेली नाही. देशाची आजची स्थिती आटोक्याबाहेर जाणारी आहे. बाजार एकत्रिकरणाची सोय शासनाने कोलमडून टाकली आहे.