Wed, Jan 23, 2019 14:57होमपेज › Satara › सातारा : वाईत चाकूने वार करून खुनी हल्ला

सातारा : वाईत चाकूने वार करून खुनी हल्ला

Published On: Jul 27 2018 8:51AM | Last Updated: Jul 27 2018 8:51AMवाई : प्रतिनिधी

वाई येथील वर्दळीच्या किसन वीर चौकातील साधना लॉज-जमदाडे रसवंती दरम्यान गुरुवारी रात्री एकावर चाकूसारख्या धारदार शस्त्राने हल्ला झाला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासाला सुरुवात केली. दरम्यान, या हल्ल्यात गंभीर जखमीवर सिव्हील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, एकसर येथील सिध्दार्थ घाडगे याने राहूल गोळे रा. मुगाव याच्यावर वैयक्तिक कारणांवरून चाकूने वार केले. जबरी खुनी हल्ला झाल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाला. राञी साडेअकरा वाजता ही घटना घडल्यानंतर बघ्यांची गर्दी उसळली. जखमीला तात्काळ उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले.