Mon, Sep 24, 2018 09:59होमपेज › Satara › खटावमधे लॉंड्री, झेरॉक्स सेंटरला आग, ३ लाखांचे नुकसान 

खटावमधे लॉंड्री, झेरॉक्स सेंटरला आग, ३ लाखांचे नुकसान 

Published On: Apr 19 2018 6:01PM | Last Updated: Apr 19 2018 6:01PMखटाव : प्रतिनिधी

खटाव येथील अशोक शेडगे यांचे मुख्य बाजारपेठेतील लॉंड्री, झेरॉक्स सेंटर आणि स्टेशनरीचे दुकान बुधवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाले. आगीत तीन लाखांचे नुकसान झाले.

अशोक  शेडगे यांचे मुख्य बाजारपेठेत भैरवनाथ मंदीराशेजारी लाँड्रीचे  दुकान आहे. त्यांच्या पत्नी सौ.सविता या दुकानात  झेरॉक्स सेंटर आणि स्टेशनरी माल विक्रीचाही व्यवसाय करतात. बुधवारी रात्री दहा वाजता  दुकान बंद करून ते घरी गेले. आज  पहाटे त्यांच्या दुकानातून धूर निघत असल्याचे मॉर्निंग वॉकला  जाणाऱ्यांनी पाहिले. शेडगे यांना त्वरित याबाबत माहिती देण्यात आली. शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्नही केला. शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत  दुकानातील झेरॉक्स मशीन,लॅमिनेशन मशीन,लाँड्रीचे कपडे,स्टेशनरी साहित्य, काकडी फर्निचर, फॅन जळून खाक झाले. एकूण तीन लाखांचे नुकसान झाल्याची माहिती शेडगे यांनी दिली. या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस स्टेशनला या घटनेची नोंद करण्यात आली.