होमपेज › Satara › काळ्याकड्यात कन्टेनर दरीत कोसळताना लटकला 

काळ्याकड्यात कन्टेनर दरीत कोसळताना लटकला 

Published On: Apr 30 2018 1:46AM | Last Updated: Apr 30 2018 1:39AMपाचगणी : वार्ताहर

केळघर घाटातील काळाकड्याच्या तीव्र वळणावर कन्टेनरची ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या प्रसंगअवधानामुळे चित्रपटात दाखवतात असाच काळाकड्याच्या तीव्र दरीमध्ये लोंबकळत राहिल्याने सुमारे ३०० फुट दरीत कोसळल्यापासुन बालबाल बचावला. कन्टेनरचे चालक व क्लीनरने प्रसंगावधान राखुन चालत्या कन्टेनरमधुन उडी मारल्याने सुदैवाने काणतीच जीवितहानी झाली नाही. 

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहीतीनुसार महाडवरुन सातार्‍याकडे केमिकल भरुन निघालेला कन्टेनर (क्रमांक एच आर ५५ एक्स ७५५४) हा महाबळेश्वर नजीकच्या केळघर घाटात काळाकड्याच्या तीव्र वळणावर गाडीचे ब्रेक निकामी झाल्याने कठड्यावर लोंबकळत राहिला. कंटनेरचा चालक मलंग शेख व क्लिनर साहेबलाल शेख यादोघांनी प्रसंगवधान राखत चालत्या गाडीतुन उडी मारली. कन्टेनर काळाकड्याच्या दरीच्या बाजुला असलेल्या झाडाच्या खोडामध्ये अडकल्याने दरीत कोसळला नाही.

चित्रपटातील प्रसंगासारखाच कन्टेनर अडकल्याने प्रत्यक्ष पहाणार्‍या प्रत्येकाने आश्चर्याचा धक्‍का बसला. काळाकड्यात सुरक्षा रक्षक कठाडे नसल्याने आजपर्यत चार मोठे अपघात होवुन कित्येक चालकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. काळ्याकड्याच तीव्र वळण म्हणजे मौत का कुआ म्हणुन ओळखले जाऊ लागले आहे. 

दरम्यान अपघाताची बातमी मेढा पोलीसांनी कळताच तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने घटनास्थळी दाखल झाले असुन रात्री उशीरा पर्यंत लटकलेला कन्टेनर काढायचे काम सुरु होते .