Sat, Mar 23, 2019 12:40होमपेज › Satara › कस्तुरींनो, चला गणपतीपुळ्याला

कस्तुरींनो, चला गणपतीपुळ्याला

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:01PMकराड : प्रतिनिधी

देवदर्शन व समुद्रांच्या लाटांचा मनसोक्‍त आनंद लुटण्यासाठी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबतर्फे रविवार दि. 11 फेबु्रवारी रोजी खास कस्तुरीच्या सदस्यांसाठी गणपतीपुळे येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन केले आहे.  या सहलीत कस्तुरींना प्रायव्हेट बीचच्या लाटांवर मनसोक्‍त पोहता येणार आहेच याशिवाय आनंद देणार्‍या बर्‍याच गोष्टी कस्तुरींना क्लबतर्फे अनुभवता येणार आहेत. 

जानेवारी — फेबु्रवारी हे सहलीचा आनंद लुटण्याचे दिवस असतात. थंड हवा, फ्रेश मुड यामुळे याच दिवसांत सहलींचे आयोजन केले जाते. याचमुळे कस्तुरी क्लबतर्फे गणपतीपुळे येथे सहल आयोजित केली असून सकाळच्या नाष्ट्यापासून ते रात्रीच्या जेवणाची सोय कस्तुरी क्लबतर्फे करण्यात येणार आहे.  सकाळी लवकर कराडमधून निघून रात्री उशिरापर्यंत परत असे सहलीचे नियोजन आहे. 

सर्व ठिकाणच्या स्थलदर्शन तिकिटासह सर्व खर्च सहल खर्चामध्ये समाविष्ट असणार आहे. मर्यादित आसन क्षमता असल्याने सदस्यांनी लवकरात लवकर आपली सिट बुक करावी. प्रथम येणार्‍यास प्रथम सिट अशी बैठक व्यवस्था असल्याने त्वरीत सिट बुक करावी. 

अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 यांच्याशी संपर्क  साधावा.