होमपेज › Satara › सुरेल मैफिलीने कस्तुरी मंत्रमुग्ध

सुरेल मैफिलीने कस्तुरी मंत्रमुग्ध

Published On: Sep 03 2018 1:42AM | Last Updated: Sep 02 2018 10:11PMकराड : प्रतिनिधी

‘हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगी मे’, ‘हवाहवाई’,‘दिल तो है दिल’,‘लगी आज सावन की’ आदी जुन्या गाण्यांची श्रवणीय मैफिल व सुरेल संगीत, आवाजाची जादुई दुनिया अनुभवत दै. ‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लब व किशोर कुमार फॅन क्लबच्यावतीने घेण्यात आलेला ‘अमर चाँदनी’ या अजरामर गाण्यांच्या मैफिलीने महिला मंत्रमुग्ध झाल्या. 
सौंदर्य व अभिनय सम्राज्ञी अभिनेत्री स्व. श्रीदेवी व देखणा व अभिनयगुणसंपन्न अभिनेता विनोद खन्ना यांच्या अजरामर, अविट, सुरेल गीतांचा कार्यक्रम येथील वेणूताई चव्हाण सभागृहामध्ये आयोजित केला होता. यावेळी कराडच्या कोरिओग्राफर मिनल ढापरे व फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावणारी अलाफिया मुल्ला, संजय बदियानी, प्रशांत पाटील, मनोहर पवार यांचा सत्कार दै. ‘पुढारी’चे कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जाहिरात विभागाचे विकास पाटील, उपसंपादक प्रतिभा राजे उपस्थित होते. 

‘हर किसीको को नही मिलता’ या संपदा इक्विपमेंटस्चे सागर शिराळकर यांच्या सुमधूर, सुरेल आवाजाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर  ‘दिल तो है दिल’डॉ. शुभा दीक्षित यांनी गायले. संजय बदियाणी यांनी ‘लगी आज सावन की’ हे गीताने कार्यक्रमात जान आणली.

अरविंद, डॉ. वनारसे यांनी तेरे मेरे होटोपे गित गायले. धनंजय कुलकर्णी,राजू कुलकर्णी हेमंत जानुगडे, श्रुती शिराळकर  अजय, आरती बेंदूर, स्वप्ना कुलकर्णी यांच्या  गाण्यांनी ठेका धराय लावला, संजीव नाईक, शेखर गायकवाड, डॉ. वर्षा देशपांडे, श्रीकांत जोशी, अजय भट्टड यांच्या गीताने अनिरूध्द दीक्षित यांच्या गिटार वादनाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध झाला. 

कार्यक्रम ओमकार सर्जिमेड व श्रीम सलून अ‍ॅन्ड स्पा यांच्या सहकार्याने करण्यात आला. कार्यक्रमामध्ये  ‘कलर्स चॅनेल’च्या डान्स दिवाने व शोमध्ये आपल्या आकर्षक व वेगळ्या अदाकारीने पहिल्या 10 फेर्‍यांपर्यंत पोहोचणार्‍या कराडच्या कोरिओग्राफर मिनल ढापरे व फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावणारी रेठरे बुद्रुक येथील अलाफिया मुल्ला यांचा सत्कार दै. पुढारीच्यावतीने करण्यात आला. 

तसेच स्टुडिओ 11  सलून अ‍ॅण्ड स्पा कराडच्या नर्गिस युसूफ रोनद, प्रज्ञा शेट्टी यांनीही त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले. प्रास्ताविक बदियाणी उद्योग समुहाचे संजय बदियाणी यांनी केले.  यावेळी कस्तुरीच्या क्बलच्या नोंदणीस महिलांची उत्स्फुर्त गर्दी झाली होती.