Wed, Jul 17, 2019 18:48होमपेज › Satara › रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या तरुणांचा अपघात : दोघे गंभीर

रंगपंचमी खेळण्यासाठी गेलेल्या तरुणांचा अपघात : दोघे गंभीर

Published On: Mar 06 2018 6:32PM | Last Updated: Mar 06 2018 6:32PMबामणोली :वार्ताहर

 सातारा शहरातील तरुणाई कास परिसरात रंगपंचमी खेळण्यासाठी उतरली होती. रंगपंचमी साजरी करण्यासाठी दुचाकीवरून कास पठारकडे सुसाट वेगाने जाताना एका दुचाकीचा  व चार चाकी वाहनाचा प्रकृती रिसॉर्ट व हेरिटेज वाडी यादरम्यान भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील तरुण तरुणी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.