Fri, Feb 22, 2019 11:39होमपेज › Satara › कास, बामणोलीला अखेर लाल परी सुरु

कास, बामणोलीला अखेर लाल परी सुरु

Published On: Dec 03 2017 1:07PM | Last Updated: Dec 03 2017 1:07PM

बुकमार्क करा

बामणोली: वार्ताहर

यवतेश्वर घाट पडल्याने कास बामणोली गोगवे या भागातील एसटीबस सेवा पूर्णपणे ठप्प होती. काही दिवस छोट्या यशवंती बसने या भागातील विद्यार्थी व प्रवाशांना सेवा पुरवण्याचा प्रयत्न सातारा आगराकडून सुरु होता. मात्र तो देखील अपुरा पडत होता. मात्र दैनिक पुढारीने या भागातील लोकांच्या एसटी बस  बंद असल्याने होणारे हाल यावर प्रशासनाचे वारंवार लक्ष केंद्रित केले आणि अखेर कास बामणोली गोगवे या मार्गावर लाल परी धावायला सुरुवात झाल्याने या भागातील प्रवाशांच्या व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.या संपूर्ण गावातील लोकानी व विद्यार्थ्यानी दैनिक पुढारीला धन्यवाद दिले.  यात्रा हंगामात लाल परी सुरु झाल्याने मुंबईकर मंडळी व कास, बामणोली, गोगवे या भागातील जनतेची दळणवळणानाची सोय झाली.