Wed, Feb 20, 2019 16:49होमपेज › Satara › कराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध 

कराडामध्ये मनसेकडून राज्यमार्गावरील गतीरोधकास विरोध 

Published On: Dec 07 2017 6:22PM | Last Updated: Dec 07 2017 6:22PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

कराड-विटा मार्गावर असणाऱ्या येथील सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय परिसरात रस्त्यावर सुरू असणारे गतीरोधक टाकण्याचे काम मनसे पदाधिकाऱ्यांकडून गुरुवारी बंद पाडण्यात आले. 

न्यायालयाच्या निर्देशानुसार गतीरोधक न करता काम सुरू होते. तसेच मोठा गतीरोधक असल्यामुळे तो वाहनांना घासत होता, मात्र असे असूनही गतीरोधक करण्याचे काम चुकीच्या पद्धतीने सुरु होते. यामुळे येथील मनसे कार्यकर्ते संतप्‍त झाले होते. यावेळी या कामाची माहिती समजताच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश जगताप, सागर बर्गे, आशिष रैनाक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेत गतीरोधक काढण्यास भाग पाडले. यावेळी प्रीतम यादव, पालिकेचे अधिकारी, ठेकेदारही उपस्थित होते.