Sat, Sep 22, 2018 15:23होमपेज › Satara › चोरी करायला आला अन् हार्टअ‍ॅटॅकने गेला

चोरी करायला आला अन् हार्टअ‍ॅटॅकने गेला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

गजानन हौसिंग सोसायटी पूर्व येथील चौंडेश्‍वरी नगरमधील पायस इंटरप्रायजेस बंगल्यातील कार्यालयात चोरीच्या उद्देशाने शिरलेल्या चोरट्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. सोमवारी रात्री हा प्रकार घडला. चोरट्याची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, त्याच्यासोबत आणखी काहीजण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 

घटनास्थळावरील मिळालेली माहिती अशी, मंदार जयराम जोशी यांची पॉलिश पेपर व त्यासंबधाने लागणारे साहित्य विक्रीची एजन्सी आहे. पायस एन्टरप्राईजेस नावाच्या फर्मचे कार्यालय व मालाचे गोदाम गजानन हौसिंग सोसायटी येथे आहे. सोमवारी कामगार नेहमीप्रमाणे सायंकाळी काम करून कार्यालय बंद करून निघून गेले. मंगळवारी सकाळी कार्यालय फोडल्याचे व व्हरांड्यात एक मृतदेह पडला असल्याची माहिती शेजार्‍यांना मिळाली. पुणे येथे कामानिमित्त गेलेल्या जोशींना मोबाईलवरून चोरीबाबत कल्पना देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, राजकुमार राजमाने यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांच्या खिशात नटराज थिअटरच्या सोमवारी रात्री 9 च्या शोची दोन तिकीटे आढळली. 
दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. बंगल्यातील कार्यालयाचा दरवाजा तोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला.