Wed, Jul 17, 2019 20:01होमपेज › Satara › टेंभू वीज प्रकल्प सील

टेंभू वीज प्रकल्प सील

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 10:58PMकराड : प्रतिनिधी

सहा लाख 75 हजार रुपयांच्या थकीत करापोटी कराड तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीने साडेचार मेगा वॉट क्षमतेचा टेंभू वीज प्रकल्प सील केला. मंगळवार, दि. 27 रोजी ग्रामपंचायतीने ही कारवाई केली.  

कोरेगाव ग्रामपंचायतीच्या थकीत करापोटी 6 लाख 7 हजार 500 रुपये मागील व चालू वर्षीचे 67 हजार 500 रुपये, असे मिळून 6 लाख 75 हजार रुपये वीज प्रकल्प व्यवस्थापन देणे होतो. याबाबत ग्रामपंचायतीने टेंभू वीज प्रकल्प व्यवस्थापनाला कर मागणी बिल व नोटीस बजावली होती. एकूण पाच नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटिसींना व्यवस्थापनाने समाधानकारक उत्तर दिले नाही. 

त्यामुळे     ग्रामपंचायतीने मंगळवारी टेंभू वीज प्रकल्पाचे कार्यालय सील केले.  सरपंच सौ. अलका पाटील, उपसरपंच सौ. शुभांगी सावंत, सदस्य प्रविण पाटील, शरद  सावंत, प्रकाश काकडे, भारत बामणे, कल्याणी पाटील, सुनीता माने, नलिनी पाटील, सुनीता कुंभार, तसेच ग्रामसेवक एस.एस. होलमुखे व ग्रामस्थांनी ही कारवाई केली. 

2008-09 या वर्षापासून प्रकल्पाने 2017-18 अखेर ग्रामपंचायतीच्या कराची कसलीच रक्कम भरलेली नाही.  साडेचार मेगावॅट वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे. बांधा वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) तत्तावर हा प्रकल्प राबविला गेला आहे. नाव जरी टेंभू वीज प्रकल्प असे असले तरी हा प्रकल्प कोरेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दित आहे.  ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी प्रकल्पाची सर्व यंत्रणा बंद करून व कर्मचार्‍यांना बाहेर काढून कार्यालय सील केले.