Thu, Nov 15, 2018 08:09होमपेज › Satara › कराड : कर वाढीविरोधात विरोधी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा

कराड : कर वाढीविरोधात विरोधी नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा

Published On: Aug 23 2018 5:57PM | Last Updated: Aug 23 2018 5:56PMकराड : प्रतिनिधी

नगरपालिकेकडून अन्यायकारक पद्धतीने संकलित करात दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करत कराड (जि. सातारा) लोकशाही आघाडीकडून याप्रश्नी जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी दिला आहे.

गुरूवारी कराड नगरपालिकेतील लोकशाही आघाडीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी सौरभ पाटील यांनी हा इशारा दिला आहे. माजी नगरसेवक सुहास पवार, नगरसेवक वैभव हिंगमिरे, मोहसीन आंबेकरी, शिवाजी पवार यांच्यासह वाखाण परिसरातील शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी सचिन चव्हाण, रोहित वाडकर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी संकलित करामध्ये झालेली वाढीबाबत मत मांडत नागरिकांवरील अन्याय कथन केला. त्यानंतर सौरभ पाटील यांनी लोकशाही आघाडी याप्रश्नी सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभी आहे. नागरिकांचे म्हणणे प्रशासनासमेर मांडले जाईल. मात्र प्रशासनाने योग्य ती दखल न घेतल्यास जनआंदोलन उभारू, अशी ग्वाही सौरभ पाटील यांनी यावेळी दिली आहे.